Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनराज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत संदेश विद्यालयाचे 'योद्धा' बालनाट्य ठरले सर्वोत्कृष्ट...

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत संदेश विद्यालयाचे ‘योद्धा’ बालनाट्य ठरले सर्वोत्कृष्ट…

मुंबई – धीरज घोलप

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, कला संस्कृती कला वेधक संस्था आणि महिला व बाल कल्याण विभाग (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्क साईट, विक्रोळी(पश्चिम), मुंबई-४०००७९ येथील संदेश विद्यालयाच्या ‘योद्धा’ या बालनाट्य चमूने प्रथम क्रमांकासह ५ पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादित केले.

सर्वोत्कृष्ट बालनाट्य : प्रथम क्रमांक
योद्धा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रथम क्रमांक
सुयश म्हात्रे व शुभम भोबस्कर

सर्वोत्कृष्ट नेपथ्य : प्रथम क्रमांक
साईश पेडणेकर व ऋषिकेश आंद्रे

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रथम क्रमांक
(विभागून)
भावना समीर पाटील (इ.१०वी),
केसर कृष्णा खंडगावकर (इ.१०वी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : तृतीय क्रमांक
इशांत कुमार लवंदे (इ.८वी)

सुयशप्राप्त बालकलाकार व सर्व तंत्रज्ञ यांचे हार्दिक अभिनंदन !

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: