Monday, December 23, 2024
Homeराज्यसंदेश विद्यालय ज्युनि. कॉलेजचे सुयश जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत प्रथम तर विभागस्तरीय स्पर्धेत...

संदेश विद्यालय ज्युनि. कॉलेजचे सुयश जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत प्रथम तर विभागस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक…

मुंबई – धीरज घोलप

क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या वतीने कांदिवली येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेच्या १९ वर्षाखालील -मुलेया गटात कुर्ला तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी(पश्चिम) येथील संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेजच्या संघाने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करून अजिंक्यपद पटकावले.

या संघाची आदर्श विद्यामंदिर, बदलापूर येथे झालेल्या मुंबई विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करत संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षिका सौ.प्रिया रमेश पेंडुलकर (विक्रोळी पार्कसाईट म.न.पा. उ. प्रा. इंग्रजी शाळा) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.सुयश प्राप्त विद्यार्थी व त्यांना विशेष मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक प्रिया पेंडुलकर तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक शिवाजी कालेकर, सुनील तांबे व सुभाष पाटील यांचे संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त व शाळेचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त डॉ. संदेश म्हात्रे व मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: