Saturday, November 23, 2024
Homeखेळमुंबई विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेजचे दुहेरी यश...

मुंबई विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेजचे दुहेरी यश…

१७ वर्षाखालील मुलांचा संघ ठरला विजेता तर मुलींचा संघ ठरला उपविजेता

मुलांच्या संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड तर दोन विद्यार्थ्यांची ‘खेलो इंडिया – युथ गेम्स’च्या निवड चाचणीसाठी निवड

धीरज घोलप

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या वतीने मुंबई विभागस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड हे जिल्हे आणि या जिल्ह्यांतर्गत असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील प्रथम क्रमांक प्राप्त शाळांचे संघ सहभागी झाले होते.

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या कबड्डीपटूंनी या स्पर्धेच्या १७ वर्षाखालील – मुले गटाचे विजेतेपद पटकावले तर १७ वर्षाखालील – मुली या गटात उपविजेतेपद पटकावून दुहेरी यश संपादित केले.

*विजेतेपद पटकावणाऱ्या १७ वर्षाखालील – मुले या संघाची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तर या संघांमधील चौहान विनय राजेश्वर (इ. ११वी) व म्हांगडे समृद्धी प्रविण (इ.११वी) यांची श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे झालेल्या ५व्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या राज्यस्तर निवड चाचणीसाठी निवड झाली.

विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुयशप्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सुनील तांबे, शिवाजी कालेकर व सचिन पाष्टे यांचे संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त व शाळेचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे आणि विश्वस्त मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: