Friday, September 20, 2024
Homeराज्यसंदेश विद्यालयाचा आदर्श शाळा पुरस्काराने गौरव...

संदेश विद्यालयाचा आदर्श शाळा पुरस्काराने गौरव…

धीरज घोलप

शिक्षक लोकशाही आघाडी, मुंबई व जॉय सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००७९ येथील संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयास शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मुंबई माजी उपमहापौर मा.श्री.बाबुभाई भवानजी यांच्या हस्ते संस्थेच्या खजिनदार प्राचार्य डॉ. सुखदा चिराटे यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी कामगार नेते व अर्थतज्ञ मा.श्री. विश्वास उटगी, टी.डी.एफ., मुंबईचे अध्यक्ष मा.श्री. जनार्दन जंगले, कार्याध्यक्ष शिवाजी कुलाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: