Monday, December 23, 2024
Homeराज्यसंदेश आंबेडकर संविधान आरपीआयच्या युवापिढीचे राजकीय नेतृत्व करणार...राजन माकणीकर यांनी दिली माहिती

संदेश आंबेडकर संविधान आरपीआयच्या युवापिढीचे राजकीय नेतृत्व करणार…राजन माकणीकर यांनी दिली माहिती

मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व युवा अभ्यासू संदेश आंबेडकर हे करणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिंव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे. संदेश आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत.

डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला पक्ष उभारून गढूळ राजकारण शुद्ध करण्याच्या उद्देशाने प्रवाहात येत असल्याचे संदेश आंबेडकर यांनी घोषित केल्याची माहिती पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

तरुणांवर ओढवलेली बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण, बहुजनांवरील जातीय अत्याचार, बौद्ध व मातंगावर होणारे जीवघेणे हल्ले थांबण्यासाठी भारतीय संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकर पुत्र राजकारणात उतरून अमूलाग्र बदल घडवतील, असा आशावाद ही राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधान माध्यमिक शालांत अभ्यासक्रमात शिकवण्यासाठी घेण्यात यावे, यासाठी आम्ही मागील १० ते १२ वर्षांपासून चालविलेल्या संविधानिक लढ्याला संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे अधिक बळ व गती येऊन सरकारला या मागण्या मान्य करवून घेण्यास लवकरच यशस्वी होऊ,अशी ग्वाही ही डॉ. माकणीकर यांनी दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: