जनतेच्या विविध समस्या मांडण्यासाठी आपला प्रतिनिधी आमदाराला निवडून देतो मात्र काही कुचकामी आमदार आश्वासन देवून काम करीत नाहीत, तेव्हा जागरूक जनता उद्रेक करते. तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात अपूर्ण प्रकल्पांवर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (TRS) च्या आमदारावर जोडे आणि चप्पलने हल्ला केला. अनेक योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेधही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना पाठलाग करून हिसकावून लावले.
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील गनेरुवरम मंडलातील गुंडलापल्ली गावात रविवारी ही घटना घडली. टीआरएस आमदार रासमी बालकिशन हे गावाच्या दौऱ्यावर गेले होते. त्याचवेळी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला.
परिसरातील रस्ता दुपदरी करून अन्य प्रकल्प राबविण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जमून आमदाराच्या विरोधात धरणे व आंदोलन सुरू केले. आमदारांनी या प्रकल्पांची आश्वासने दिली होती, मात्र ती अनेक दिवसांपासून अपूर्णच आहेत.
जिल्हा काँग्रेसने पाठिंबा दर्शविला
करीमनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कवमपल्ली सत्यनारायण यांनी आमदार विरोधात युवक काँग्रेसच्या तीव्र आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, पोलिस या निदर्शनासाठी युसीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचा विचार करत आहेत.