Wednesday, December 25, 2024
Homeगुन्हेगारीरामटेकच्या एस.डी.ओ. वर रेतीमाफियांचा हल्ला...

रामटेकच्या एस.डी.ओ. वर रेतीमाफियांचा हल्ला…

  • रामटेक पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल
  • ८ ट्रक ताब्यात काही ट्रक फरार
  • तुमसर मार्गावरील घोटीटोक जवळील घटना

रामटेक – राजु कापसे

रेतीमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रामटेकच्या एस.डी.ओ. वंदना सवरंगपते तथा त्यांच्या पथकावर रेतीमाफीयांनी प्राणघातक हल्ला करण्याची घटना दि. १४ जानेवारी ला दुपारी २ वाजता दरम्यान तुमसर मार्गावरील घोटीटोक जवळ घडली. एस.डी.ओ. सह पथक थोडक्यात बचावले असुन घटनेमुळे संपुर्ण महसुल प्रशाषण हादरले आहे.

याबाबद महसुल प्रशाषणातर्फे रामटेक पोलीस येथे तक्रार दाखल करण्यात आली असुन आरोपींचा शोध सुरु आहे. एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि. १४ जानेवारीला तुमसर येथुन ३० ते ४० ट्रक रेती घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती स्थानीक महसुल विभागाला मिळाली होती. तेव्हा स्थानीक महसुल विभागाचे पथक तुमसर मार्गावरील घोटीटोक येथे तैनात ठेवण्यात आले होते, त्यात एस.डी.ओ. वंदना सवरंगपते ह्या सुद्धा होत्या.

मात्र याची भनक आरोपी ट्रकचालकांना लागल्याने ते तुमसर येथेच थपकुन होते. तेव्हा ट्रक वर कारवाई करण्यासाठी त्यांना आपल्या हद्दीत येणे गरजेचे आहे असा विचार करून एस.डी.ओं. नी ते पथक तेथुन काही वेळेसाठी हटविले. ही माहिती ट्रकचालकांना मिळताच त्यांनी आपले ट्रक रामटेकच्या दिशेने दमटवले. संशय येताच एस.डी.ओं. नी त्या सर्व ट्रक ला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र यात ८ ते १० ट्रक इतरत्र पळुन जाण्यात यशस्वी ठरले, तर इतर ट्रक चा एस.डी.ओ. वंदना सवरंगपते सह त्यांच्या पथकाने पाठलाग केला व काही अंतरावर थांबविले.

तेव्हा संतापुन जावुन ट्रक चालकांनी हातोडा, सब्बल घेऊन एस.डी.ओं. च्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु घटना होता होता राहिली व पथक थोडक्यात बचावले. यावेळी तब्बल आठ ट्रक जप्त करण्यात यश आले. महसुल विभागाने रामटेक पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असुन पोलीस प्रशाषन आरोपींचा शोध घेत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: