Saturday, December 21, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तिकीट 'सम्राट' यांनाच मिळणार?…जयंत पाटील यांच्या...

मूर्तिजापूर विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तिकीट ‘सम्राट’ यांनाच मिळणार?…जयंत पाटील यांच्या ‘या’ पोस्ट मुळे चर्चेला उधान…

मूर्तिजापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांचं काल शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. या सभेची दाखल खुद शरद पवार यांनी घेतल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच पक्षाची राज्याची धुरा सांभाळणारे जयंत पाटील यांनी सोशल मिडीयावर भली मोठ पोस्ट लिहून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना चकित केले आहे. या पोस्टमध्ये सम्राट डोंगरदिवे यांचे आभार मानत लिहले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील 5000 भगिनींना सुरक्षा कवच असलेले अनोखे रक्षाबंधन भेट दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक शरदचंद्र पवार पक्षाचे अकोल्याचे जिल्हा परिषद सदस्य. सम्राट डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा कार्यक्रम पार पडला, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या घरातला मुलगा बेकार आहे. याला कारणीभूत आहे आपले सरकार. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणाचाच लाडका नव्हता. मात्र, तू मारलेली अशीच थप्पड सर्वत्र आली आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीच्या क्षमतेशिवाय असंख्य योजना राबवल्या जात आहेत. हे सावत्र भाऊ प्रेम आहे. म्हणूनच ते तुम्हाला तीन महिने मदत करणार आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे भाऊ विजयी झाले तर आम्ही तुमच्या पदरात अधिक कार्यक्षम योजना मांडू.

आज सम्राट डोंगरदिवे यांनी भगिनींना राष्ट्रवादी सुरक्षा कवच दिले. मी तुम्हाला वचन देतो की निवडणुकीनंतर आम्ही महाराष्ट्रातील भगिनींना हे संरक्षण कवच देऊ. असे सोशल मिडीयावर लिहले. तर मूर्तिजापूर शहरात प्रथमच भरगच्च असलेली सभा शहरातील जनतेला पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी आपल्याच पक्षातील काही फुकट्या नेत्यांनी या मतदारसंघात फुल SC चालत नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून हाफ SC मागवला त्याची चांगली लूटमारही केली. तर काल पर्यंत त्यानेही या नेत्यांना सहन केले मात्र कालची सभा पाहून त्याचेही डोळे फाटले. आता त्याला पुढचा मार्ग सुचेनासं झाल्याने तो परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. सम्राट डोंगरदिवे बौद्ध असल्यामुळे विरोध करणाऱ्यां फुकट्या नेत्याच्या तोंडावर हि मोठी चपराक बसल्याचे बोलले जाते. पक्षात राहून जातीविषयक संभ्रम पसरवणारे हे फुकट खाऊ नेते यांचं काल तोंड पाहण्यासारखे होते. यांनी मतदारसंघात आणलेला पार्सल उमेद्वारही काल सभास्थळी दिसला नाही. या पार्सल ला आपल्या जिल्ह्यात परत येण्यासाठी तिकिटाचे पैसे सुद्धा शिल्लक ठेवले नसल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: