Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहाराजपूर येथे सम्राट राजाभोज जयंती तथा पोवार समाज मेळावा थाटात संपन्न...

महाराजपूर येथे सम्राट राजाभोज जयंती तथा पोवार समाज मेळावा थाटात संपन्न…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील महाराजपूर येथे पोवार समाज बहुउद्देशीय संस्था, रामटेकच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दि. १७/०२/२०२४ ला सम्राट राजाभोज जयंती तथा पोवार समाज सम्मेलन घेण्यात आले.

यावेळी उद्घाटक म्हणून श्री डी. मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार रामटेक विधानसभा, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सौ. प्रितीताई मानमोडे (प्रदेश महामंत्री, वैद्यकीय आघाडी, भाजपा), प्रमुख मार्गदर्शक मोतीलाल चौधरी (राष्ट्रीय उपाध्यक्ष पोवार महासभा), विशेष अतिथी पृथ्वीराज रहांगडाले (पोवार युवक संगठन, नागपूर), छगन रहांगडाले (अध्यक्ष, पोवार समाज, खापरखेडा), आदर्श पटले (भाजपा जिल्हा महामंत्री, नागपूर), भागचंद शरणागत, नागपूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यानंतर समाजातील इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार, वयोवृद्धांचा सत्कार करण्यात आला. संचालन राहुल जयतवार, प्रास्ताविक भगवानदास बिसने, आभार छमेशकुमार पटले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बिसेन, भजनलाल कटरे, उमेश पटले, कमलेश शरणागत, आशिष शरणागत, धनराज शरणागत, किशोर रहांगडाले, मुरलीधर रहांगडाले, कांतीलाल पटले, खरकसिंग बिसेन, रमेश पटले, जयसिंग बिसेन यांचेसह अनेकांनी परिश्रम घेतले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: