Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीएकाच डुप्लेक्सची दोनदा विक्री, आकोट पोलिसांनी केला गुन्हा दाखल...

एकाच डुप्लेक्सची दोनदा विक्री, आकोट पोलिसांनी केला गुन्हा दाखल…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरालगतच असलेल्या अकोला मार्गावरील सन सिटी येथील 2 BHK डुप्लेक्सचा सौदा १९ लक्ष ३१ हजार रुपयांना करण्यात आला होता. खरेदीदार पंकजसिंह सुरेशसिंह बघिले राहणार अकोला रोड आकोट यांनी सदर डुप्लेक्स चा ताबाही घेतला होता. तरीही डुप्लेक्स विक्रेता महावीर प्रसाद उर्फ चंदू दुबे व दुर्गाप्रसाद दुबे राहणार दर्यापूर मार्ग आकोट यांनी हा डुप्लेक्स ताबीदाराची संमती न घेता दुसऱ्यांदा रोशनी महेश वानखडे व महेश सुरेशराव वानखडे यांचे नावे खरेदी करून दिला. त्यासोबतच त्या डुप्लेक्स चा ताबाही नवीन खरेदीदारांना दिला.

असे करून डुप्लेक्स विक्रेत्यांनी प्रथम खरेदीदार पंकजसिंह बघेले यांची फसवणूक केली. त्याने व्यथित होऊन प्रथम खरेदीदार यांनी आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आकोट पोलिसांनी अपराध क्रमांक ५५०/२०२२, भादवी ४२०,५०६,३४ अन्वये चंदू दुबे व दुर्गाप्रसाद दुबे यांची विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाणेदार प्रकाश अहिरे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: