सांगली – ज्योती मोरे.
संभाजी भिडे गुरुजींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल केलेले वक्तव्य निश्चितपणे निषेधार्य असून केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो.अशी प्रतिक्रिया सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी एन एक्स टी मराठीशी बोलताना व्यक्त केलीय.
श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधींचे वडील हे करमचंद गांधी नसून ते एक मुस्लिम जामीनदार होते, अशा तऱ्हेचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं या त्यांच्या वक्तव्यानंतर सबंध देशभरातून भिडे यांच्या विरोधात निदर्शनं आणि आंदोलनं होताना दिसत आहे.