मुख्याध्यापक, शिक्षकांनी राबविली वर्षभर विविध उपक्रमे
रामटेक – राजु कापसे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे , विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे , शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे , आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे व विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक सहाय्यता साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळांना प्रेरित करण्यासाठी संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ राबविण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने शहरातील समर्थ प्राथमिक शाळेत सुद्धा वर्षभरापासून शाळा सजावट, विविध प्रकारचे वृक्ष लागवड तथा इतर प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
शाळेला भेट दिली असता येथील मुख्याध्यापक गुंढरे मॅडम तथा उपक्रमशिल शिक्षक रवींद्र मथुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अभियानाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेत वर्षभरात शाळा सजावट, विविध वृक्ष लागवड त्याची जाेपासना, शाळा ईमारत व संरक्षण भिंत रंगरंगाेटी, डिजिटल वर्गखाेल्या , मेरी माटी मेरा देश उपक्रम, परसबाग निर्मिती, नवसाक्षरता कार्यक्रम, स्वच्छता माँनिटर , महावाचन चळवळ, विविध स्पर्धा, आराेग्य तपासणी, आजार तद्यांचे मार्गदर्शन, हात धुने उपक्रम,
प्लास्टिक मुक्त शाळा, विविध संस्था व पालक यांचे शाळा विकासाकरीता याेगदान ईत्यादी उपक्रम गेल्या वर्षभरापासून राबविल्या जात आहेत. अशा विविध स्पर्धा व उपक्रमांतून मुलांचा भरघोस असा विकास होईल यात दुमत नाही. राज्यात टप्पा २ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत असून मोठ्या रकमेचे पुरस्कार सुद्धा ठेवण्यात आले आहे.
मोठी रक्कम शाळांना मिळणार असल्याने जवळपास सर्वच शाळा आपल्या शाळेचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्नरत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनीही या अभियानात स्वयंस्फूर्त सहभाग घेतलेला असून त्यामुळे शाळा विकासात या अभियानाचे मोलाचे योगदान राहणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सन २०२३ – २४ मध्ये पटकाविले दोन लाखांचा पुरस्कार
‘ छडी लागे छमछम, विद्या येई घमघम ‘ अशी पुर्वीसारखी परिस्थिती आता शाळांमध्ये राहिली नाही तेव्हा मुलांकडून हे सर्व उपक्रम राबवून घेणे जणु शिक्षकांसाठी एक तारेवरची कसरतच आहे असे असले तरी मात्र मागील वर्षी समर्थ प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका गुंढरे मॅडम यांचे मार्गदर्शनात उपक्रमशिल शिक्षक रवींद्र मथुरे यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात स्वतःला झोकुन देण्याचे आवाहण केले होते.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी सुद्धा या सर्व स्पर्धांमध्ये आवर्जून सहभाग घेतला होता. परिणामस्वरूप मागील वर्षी या शाळेला ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन २०२३ – २४ ‘ मध्ये खाजगी गटात तालुका स्तरावर दुसरा क्रमांक मिळाल्याने तब्बल दोन लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळाला हे विशेष.