रामटेक – राजु कापसे
रामटेक शहरातील समर्थ प्राथमिक शाळा येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व शाळेचा नचनिर्वाचित मुख्याध्यापिका साै.कविता जाैजाळ मँडम व महात्मा गांधी यांची वेशभुषा केलेल्या राया बावणकर यांच्या हस्ते गांधीजी व शास्त्रीजी यांचा प्रतिमेला माल्यापर्ण करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका जौंजाळ मँडम यांनी प्रास्ताविक भाषणात विद्यार्थांना महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जिवनचारित्र्यावर माहिती दिली. त्यानंतर शालेय विद्यार्थांनी केलेल्या त्यांच्या सुंदर भाषणात महात्मा गांधी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
विद्यार्थांनी साकारलेल्या महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांची सुंदर वेशभुषा जनुकाही शाळेत शाळेत गांधिजी, शास्त्रीजी अवतल्याचेच भासत हाेते.
प्रसंगी या सर्व वेशभुषा साकारलेल्या व गांधिजीचा व शास्त्रीजींचा जिवनावर सुंदर भाषण करणार्या विद्यार्थांना शाळेच्या मुख्याध्यापिका साै. जाैजाळ मँडम यांचा हस्ते पारिताेषिक देऊन गाैरविण्यात आले.प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता माेलाचे सहकार्य केले