नांदेड – महेंद्र गायकवाड
रविवार, दि. ९ एप्रिल रोजी माहूरगड येथे समनक जनता पार्टीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संपत आर. चव्हाण यांनी दिली.
समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विकास आघडीचे अॅड. अण्णाराव पाटील हे राहणार असून उद्घाटन महान तपस्वी योगानंद महाराज करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण कालापाड, अमरसिंग तिलावत, शब्बीरभाई अंसारी, शंकर पवार, डॉ. शिवाजी खंदारे, कल्याण दळे, दशरथ राऊत, दिनकर वाघमारे,
नंदेश अंबाडकर, सतीश कसबे, उमेश कोराम, मंगेश सोळंके, सुनील गोटखिंडे, आत्माराम जाधव, कांतीलाल नाईक, मोरसिंग राठोड, रूबिना पटेल, रविकांत राठोड, उल्हास राठोड हे राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तसेच या देशातील वंचित, उपेक्षित, पिडीत लोकांचा शैक्षणिक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात तसेच इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्याप्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झाला नाही.
लोकांवर अन्याय, अत्याचार वेगवेगळ्या माध्यमातून होत आहेत, परंतु कुठल्याच राजकीय पक्षाने त्यांना न्याय मिळवून दिला नाही. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी व संविधान वाचविण्यासाठी तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता अबाधित राखण्यासाठी समनक जनता पार्टीची स्थापना करण्यात आलेली आहे.
तसेच समान वाटा, समान हिस्सा मिळवून देण्यासाठी व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी ही पार्टी काम करणार असल्याची माहिती प्रा.डॉ. अनिल राठोड, प्रा.डॉ. माणिक राठोड, अॅड. प्रदीप राठोड, विजय जाधव, डॉ. राजेश चव्हाण यांनी दिली.