सिरसोलीत मराठा शौर्य दिन सोहळा
कॅप्टन सुनील डोबाळे यांचे राष्ट्रभक्तांना आवाहन
अकोट – इंग्रज सैन्य कापुन काढणाऱ्या विर मराठ्यांना २९ नोव्हे. रोजी मानवंदना देण्यासाठी सिरसोलीत मराठा शौर्य दिन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.व या सोहळ्यात हजोरो नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय सैन्य सेवेतुन निवृत्त झालेले कॅप्टन सुनिल डोबाळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अकोट शहरापासुन १० कीमी अंतरावरील व तेल्हारा तालुक्यातील सिरसोली या गावी २३ नोव्हे. ते २९ नोव्हेंबर १८०३ मध्ये मराठा व इंग्रज यांच्या मध्ये फार मोठे युद्ध झाले होते .या युद्धात लोर्ड वेलस्ली ( गव्हर्नर जनरल ,जगप्रसिद्ध युद्धनिती तज्ञ ) यांच्या उपस्थितित कॅप्टन केन हा इंग्रजी फौजेचे नेतृत्व करत होता.तर मराठा फौजेचे नेतृत्व मनोहर बापु भोसले हे करीत होते.
त्यांना विश्वासू शुरविर समशेरबहाद्दर सरदार कर्ताजीराव जायले मदतीला होते. कर्ताजीराव जायले हे श्री संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज यांचे वडील तथा श्री संत वासुदेव महाराज यांचे पणजोबा होते.हे युद्ध ६ दिवस चालले. इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्रे असुनही मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्य कापून काढले होते.कर्ताजीराव जायले यांनी स्वतःचे बलीदान देऊन कॅप्टन केनला ठार मारले.
या युद्धात अठरा पगड जातीतील सर्व सैनिक जिवाची पर्वा न करता लढले व अतुलनीय शौर्य गाजविले साता समुद्राच्या पार असणारे ब्रिटिश दरवर्षी कॅप्टन केनला श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी या युद्धाच्या तारखांवर या ठीकाणी येतात पण भारतीय मात्र या युद्धाबद्दल अनभिज्ञच ठरत आहेत.या युद्धातील पराक्रमाची जागतीक नोंद आहे.
या युद्धातील मराठा युद्धनीतीचा वापर करून नेपोलियन बोनापार्टचा पराभव केला असे खुद्द लार्ड वेलस्लीने लिहून ठेवले आहे.शुरविर सरदार कर्ताजीराव जायले व सर्व अठरा पगड जातीतील शहिद सैनिकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व राष्ट्रभक्तांनी यावर्षी 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी सिरसोली येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून या गौरवशाली ईतिहासाला वंदन करावे असे आवाहन भारतीय सैन्य सेवेतुन निवृत्त झालेले कॅप्टन सुनिल डोबाळे तथा .समस्त राष्ट्रप्रेमी ईतिहास प्रेमी भुमिपुत्र जनतेने केले आहे.या मराठा शौर्य दिनाला हजारोंच्या संखेने उपस्थिती लावत इंग्रजांना धुळ चारणाऱ्या विर बलिदानी मराठा सरादार व अठरा पगड मराठा सैन्याला मानवंदना देण्यासाठी उपस्थीती लावावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२९ नोव्हे. रोजी मराठा शौर्य दिना निमित्य सिरसोली येथे स.10 वा. आगमन दु.12 वा. सामुहीक श्रद्धांजली दु.12.30 पर्यंत ईतिहासाचा मागोवा घेणारीभाषणे,शाहिरी ,पोवाडे,कविता.मराठा शहीदांना मानवंदना दु. 1.30 वा. सहभोजन. सायं. 3.30 वा. सांगता करण्यात येणार आहे.