रामटेक – राजु कापसे
ब्लड फॉर बाबासाहेब या अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामटेक येथे १५७ व्यक्तींनी ऐच्छिक रक्तदान करून बाबासाहेबांना एक विशाल अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या उत्थानासाठी केलेले अपार कष्ट, त्याग व समर्पणाची जाण राखून तळागाळातील माणसाला उपचारादरम्यान भासणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देता यावे यासाठी भारतीय समाजातील विवीध सामाजिक व सेवाभावी संघटनांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर प्रदीप बोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव महाजन प्रमुख अतिथी आमदार आशिष जयस्वाल, ग्रामीण जिलाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, माजी नगरअध्यक्ष दिलीप देशमुख, डॉ. हरीश वरभे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, पोलिस उपविभागीय अधिकारी आशित कांबळे, तहसीलदार बाळासाहेब मस्के,पोलिस निरीक्षक प्रमोद मक्केश्वर ,पोलिस उप निरीक्षक कार्तिक सोनटक्के,
ॲड. प्रफुल्ल अंबादे, विवेक तोतडे, सचिन इरफान, गोपी कोल्लेपरा सुमित कोठारी, राजेश किम्मतंकर यांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करताना बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श पुढे घेऊन जाताना ब्लड फॉर बाबासाहेब अभियान द्वारा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजात माणुसकीचा विचार रुजविण्याचे महान कार्य केले जात असल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साक्षोधन कडबे, संचालन मनिष खोब्रागडे आभार नितीन भैसारेआकाशझेप फाऊंडेशन,
भारतीय बौध्द महासभा, रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक, रमाई बौध्द विहार समिती रामटेक, कल्याण मित्र बौध्द विहार समिती शितलवाडी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच रामटेक तालुका, आंबेडकरी युवा विचार मंच रामटेक तालुका, पत्रकार संघटना रामटेक तालुका, महिला भगिनी मंडळ रामटेक, ग्राम पंचायत कर्मचारी युनियन रामटेक तालुका, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रामटेक तालुका, परिवर्तन मंच व बहुद्देशीय संस्था रामटेक,
युवा सरल असोशिएशन, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, अखिल भारतीय तांडा सुधार समिती, वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेशन रामटेक, राजे ग्रूप रामटेक, राम राज्य ढोल ताशा पथक रामटेक, रामटेक तालुका वकील संघ, सह्याद्री जनविकास बहु. संस्था, युवा चेतना मंच, एकलव्य युवा सेना रामटेक, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना-रामटेक तालुका, युनिव्हर्सल युथ फाउंडेशन, सरपंच सेवा संघ रामटेक तालुका,
मायनॉरिटी वूमन अपलिफ्ट सोसायटी ऍण्ड ट्रस्ट, युनिर्व्हसल युथ फाऊंडेशन, मेडीकल असोसिएशन रामटेक, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन रामटेक, सरपंच सेवा संघ, रामटेक तालुका, धम्मज्योति बुध्दविहार समिती, रामटेक तालुका ऍग्रो डीलर असोसिएशन, रामटेक कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी लीमि. रामटेक यांचे प्रतिनिधी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहभागी संस्थांचे प्रतिनिधी वैभव तुरक, जितेंद्र कोसे, शैलेश वाढई, राज मेश्राम, रजत गजभिये, पंकज माकोडे, राजेंद्र कांबळे, पंकज चौधरी, सुभाष चव्हाण, रविंद्र नवघरे तसेच असंख्य नागरिकांनी कसोशीने प्रयत्न केले.