मालेगाव (वाशिम)- चंद्रकांत गायकवाड
मालेगाव ता 1 ज्येष्ठ विचारवंत तथा समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा हरी नरके यांना 61 व्या जयंतीनिमित्त आज ता 1 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्यामंदिर येथे दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान श्रद्धांजली समारोह पार पडला यावेळी प्रा नरके यांच्या प्रतिमेचे पूजन समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की प्रा नरके हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक होते ओबीसी आरक्षणां बाबतीत त्यांचा दांडगा अभ्यास होता याबाबत त्यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांना समर्थ साथ दिली त्यांच्यामुळे समता परिषदेला ओबीसी आरक्षणाची लढाई चांगल्या प्रकारे लढता आली प्रा नरके यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जीवनभर प्रचार केला महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य अस्सल स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.
समतेचे विचार ते पुराव्यानिशी मांडायचे कार्यक्रमाला समता परिषदेचे जिल्ह्यासचिव विठ्ठल भागवत मालेगाव तालुका अध्यक्ष कपिल भालेराव,तालुका सचिव जावेद भवानिवाले प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड यशवंतराव हिवराळे ,रवी बळी ,जिल्हा उपाध्यक्ष विलासराव रोकडे , माजी सैनिक अशोकाराव घुगे ,अमर गाभणे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल भागवत यांनी प्रास्ताविक चंद्रकांत गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन कपील भालेराव यांनी केले