Saturday, December 21, 2024
Homeमनोरंजनसलमान खानने लाँच केले 'टायगर ३'चे पहिले पोस्टर...

सलमान खानने लाँच केले ‘टायगर ३’चे पहिले पोस्टर…

न्युज डेस्क – सलमान खानने रविवारी ‘टायगर 3’ चे पहिले पोस्टर लाँच केले आणि ते एक हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन पॅक्ड ड्रामा असल्याचे दिसून येत आहे. पोस्टरमध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफही फुल अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे.

सलमान खानने स्वतः ‘टायगर 3’ चे एक धमाकेदार पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये तो त्याची ‘झोया’ कतरिना कैफसोबत बंदूक धरलेला दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, ‘मी येत आहे. टायगर 3 2023 च्या दिवाळीला रिलीज होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये या तीन भाषांमध्ये चित्रपट येणार आहे. ‘टायगर ३’ चे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत…

YRF spy universe कडून पुढील चित्रपट म्हणजे ‘Tiger 3’ जो दिवाळी 2023 साठी शेड्यूल करण्यात आला आहे. या जासूस विश्वाची सुरुवात सलमान खानसोबत ‘एक था टायगर’ (2012) मधून झाली. जिथे पहिल्यांदाच सलमान खान गुप्तहेर (spy) बनून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसला होता. त्याची पुढची ऑफर होती ‘टायगर जिंदा है’. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले जे आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स अंतर्गत बनले होते.

त्याच वर्षी शाहरुख खानचा ‘पठाण’ रिलीज झाला होता ज्यामध्ये सलमान खानचा कॅमिओ दिसला होता. आता लवकरच सलमान-शाहरुख पुन्हा एकदा दिवाळीला एकत्र दिसणार आहेत जिथे दोघेही किंग खान एक कॅमिओ असणार आहेत. टायगर 3 हा YRF स्पाई चर विश्वाचा पाचवा हप्ता आहे. यापूर्वी ‘टायगर जिंदा है’, ‘वार’ आणि ‘पठाण’ हे चित्रपट प्रेक्षकांना आवडले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: