Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayसलमान भाईचा बर्थडे...अन चर्चा मात्र संगीता बिजलानीची...काय आहे व्हायरल Video?...

सलमान भाईचा बर्थडे…अन चर्चा मात्र संगीता बिजलानीची…काय आहे व्हायरल Video?…

बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांचा काल रात्री 26 डिसेंबर रोजी 57 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. बहिण अर्पिता खान शर्मानेही तिच्या भावासाठी तिच्या मुंबईतील घरी एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत राहुल कनालसह त्याची पत्नी तब्बू, अरबाज खान, सोहेल खान, सोनाक्षी सिन्हा, जेनेलिया-रितेश देशमुख, कृतिका खरबंदा आणि पुलकित शर्मा, कार्तिक आर्यनसह इतर स्टार्स दिसले. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे शाहरुख खान आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांनी. तर सर्वात जास्त चर्चा सुरु आहे मात्र सलमान खान यांची X गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांची. सोशल मिडीयावर या दोघांचेच Video, फोटो मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असून काय खास आहे त्या video मध्ये?…

संगीता बिजलानी आणि सलमानचे फोटो व्हायरल
सलमान खानसोबत संगीता बिजलानी या अभिनेत्रीचं नाव जोडलं जातं. संगीता ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड आहे, असंही म्हटलं जातं. सलमानच्या 57 व्या वाढदिवसाच्या पार्टीला संगीतानं ब्लु ग्लिटर ड्रेस, सिल्वर इअरिंग्स अशा लूकमध्ये हजेरी लावली. तर सलमान हा त्याच्या बर्थ-डे पार्टीला ऑल इन ब्लॅक अशा लूकमध्ये दिसला. या बर्थ-डे पार्टीमधील संगीता आणि सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हायरल फोटोमधील या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं. रिपोर्टनुसार, सलमान आणि संगीता हे जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. या गोष्टीला 20 वर्षाच्यावर कालावधी झाला असला तरी मात्र आज पुन्हा नव्याने सलमान आणि संगीता यांना सोबत बघून अनेकांच्या भुवया उंचावला आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: