- बेलोना – मोवाड रस्त्यावर पुराचे पाणी असल्याने सलील देशमुख अडकले
अतुल दंढारे नरखेड–10
मागील तीन दिवसांपासून नरखेड काटोल तालुक्यात पावसाने कहर केल्याने पिका सह जमीन खरबडून नेली तर शेताने तलावाचे रूप धारण केल्याने राहिले सुरले शेतपिकांचा सत्यानाश झाला. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख हे नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पिकांचे नुकसान पाहणी करीत असताना परत येते वेळी रस्त्यावर पुलावर पाणी वाहत असल्याने त्यांना सुद्धा काही तास पाणी ओसारण्याची वाट पाहावी लागली.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे भारसिंगी येथील पुलावर पाणी असल्याने काटोल जलालखेडा मार्गावर वाहतूक ठप्प पडली. तर जलालखेडा वडविहिरा रस्तावरील वाहतूक बंद पडली तसेच नरखेड कडून मोवाड ला जाताना पाण्यामुळे रस्ता बंद पडला असून सलील देशमुख सुद्धा मार्गस्थ असताना पुरामुळे बेलोना मोवाडच्या मधातच थांबावे लागले.
तीन दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे राहिलेले असलेल्या पिकांचे जमिनीसह अतोनात नुकसान आहे. मुसळधार पावसामुळे काटोल व नरखेड तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. अनेक शेतातील पिके वाहून गेली असून शेती पूर्ण जलमय झाली आहे. ही पूर परिस्थिती पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सांगितले.