खामगाव – हेमंत जाधव
खामगाव – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या समर्थनार्थ खामगाव येथील सकल मराठा समाज बांधवानी २९ ऑक्टोबर २३ पासुन टॉवर चौकात आमरण व साखळी उपोषण सुरु केले होते, स्थानिक सकल मराठा समाजबांधवांनी मशाल मोर्चा, बसस्थानकवर एस.टी. बसेसवरील शासनाच्या कल्याणकारी योजनेच्या पोस्टरवरील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्राला काळे फासले,
आसुड आंदोलन तसेच उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या वतीने तहसीलदार अतुल पाटोळे व नायाब तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मराठ्यांचा आवाज ऐकु येण्यासाठी श्रवणयंत्र व काळे चष्मे भेट दिले होते, अशी विविध आंदोलने करण्यात आली.
काल २ नोव्हेंबर २३ रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची सांगता झालीत्यामुळे काल रात्री ८.३० वाजता स्थानिक सकल मराठा समाज बांधवांच्या उपोषण आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी तहसिलदार अतुल पाटोळे, शहर पोस्टे ठाणेदार शांतीकुमार पाटील, पीएसआय पंकज सपकाळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्युस पाजुन उपोषणाची सांगता करण्यात आली.