Monday, December 23, 2024
Homeराज्यसकल मराठा मोर्चा चेवतीने आज नांदेड बंद:कोणीही कायदा हातात घेऊन शांतता भंग...

सकल मराठा मोर्चा चेवतीने आज नांदेड बंद:कोणीही कायदा हातात घेऊन शांतता भंग करू नये – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे वतीने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजाचे आरक्षण सबंधाने उपोषनास पाठिंबा व जालना जिल्हयातील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक आज 4 सप्टेंबर सोमवार रोजी नांदेड जिल्हा बंद बाबत जिल्हयातील तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर निवेदन पोलिसांना प्राप्त झाले असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व कोणीही कायदा हातात घेऊन शांतता भंग करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी नागरिकांना केले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरात बंदचे आयोजन करून मोर्चा काढण्यात येणार आहे.सदर मोर्चा राजकार्नर येथुन 11वाजता सुरवात होवून वर्कशॉप, श्रीनगर, आय.टी.आय., शिवाजीनगर, कलामंदीर, वजिराबाद चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पर्यंत असेल . शहरातील रहदारीची वेळ असल्याने शहरात एक मार्गी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असुन पोलीसांनी दिलेल्या निर्देशानुसार वाहतुकीचे नियमाचे पालन करावे.बंद च्या अनुषंगाने संपुर्ण जिल्हयामध्ये योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला असुन कोणीही कायदा हातात घेवून शांतता भंग करू नये व शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची दक्षता घ्यावी. नागरीकांना काही अडचन असल्यास त्यांनी डायल 112 या नंबरवर संपर्क करून तात्काळ मदत उपलब्ध करून घ्यावी असेआवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: