रामटेक – राजु कापसे
देवलापार येथे संत ताजुद्दीन बाबा यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थिती दर्शवली. दरम्यान संत केक कापून संत ताजुद्दीन बाबा यांचा जन्मदिवस साजरा केला व त्यांचे दर्शन घेतले.
यावेळी सौ.सारिकाताई उइके (सरपंच ग्रा.पं. देवलापार), श्री.रामरतन गजभिये (सदस्य ग्रा.पं. देवलापार), कु. मोनिकाताई पोवरे (सदस्य ग्रा.पं. देवलापार), श्री.कैलास निघोट, श्री. हाफीजभाई शेख, श्री. मोतीराम खंडाते, श्री. मोहसीन पठाण, श्री संदीप इनवते, श्री. अशोक पारखी, श्री. आशिष पठाण, श्री. सलमान पठाण, श्री. आरिफ पठाण, श्री. उस्मान पठाण आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.