सांगली – ज्योती मोरे
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार साहेब मेहमूद पटेल या टोळीस पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीप्रमुख साहेब मेहमूद पटेल वय वर्षे 22 राहणार खामकर गल्ली खनभाग सांगली, व त्याच्या टोळीचे सदस्य रोहन सुखदेव हेगडे वय 20 राहणार सिटी हायस्कूल मागे सांगली, समीर रमजान नदाफ वय 34 राहणार नळ भाग सांगली, सलीम खुदबुद्दीन पठाण व 34 राहणार गारपीर चौक दुसरी गल्ली सांगली, जुबेर मुस्ताक मुजावर वय 26 राहणार शंभर फुटी रोड पाकीजा मशिदी जवळ सांगली, खुदबुद्दीन मुजावर वय 26 राहणार पाकीजा मशिदीजवळ सांगली,
नवाज रहीम मुल्ला वय 25 राहणार शंभर फुटी रोड पाकीजा मशिदी मागे सांगली, अतुल अनिल गुरव वय वर्षे 21 राहणार पाकीजा मशिदीसमोर अजमेरा ट्रकचे बोळात शंभर फुटी सांगली, आणि स्वप्निल अनिल गुरव वय वर्षे 23 राहणार पाकीजा मशिदी समोर अजमेरा ट्रकचे बोळात 100 फुटी रोड सांगली. या नऊ जणांच्या टोळी विरुद्ध सण 2017 ते 2022 दरम्यान मृत्यू दुखापत करण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे,
जबरी चोरी करता गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, मोबाईल चोरणे वाहनांची तोडफोड करणे, ती पेटवून देणे, घातक शस्त्र बाळगणे, अमली पदार्थाचे सेवन करणे, बेकायदा जमाव जमवून दुखापत करणे,अशा गंभीर स्वरूपाच्या मालमत्ता विरुद्ध तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे करत आहेत.
सदरची टोळी ही कायद्याला न जुमानणारी असल्याने या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाचा पोलीस अधीक्षक डॉक्टर तेली यांनी अभ्यास आणि अवलोकन करून चौकशी अधिकारी अजित टिके उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांचा चौकशी अहवाल,
टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल तसेच प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान दाखल गंभीर गुन्हा त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांची सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्वांचा विचार करून सदर टोळीस दोन वर्षाच्या कालावधीसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत देशमुख,सहाय्यक पोलीस फौजदार सिद्धाप्पा रुपनर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, तसेच पोलीस नाईक झाकीर हुसेन काझी, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत माळकर यांनी भाग घेतला.