राजु कापसे प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर, यांच्यावतीने जिल्हास्तरीय पावसाळी व्हाॅलीबाॅल क्रीडा स्पर्धा बॅरिस्टर वानखेडे महाविद्यालय खापरखेडा येथे नुकत्याच पार पडल्या. या जिल्ह्यास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांमध्ये मौदा तालुक्यातील निमखेडा येथील श्री साईबाबा विद्यालयातील वयोगट १४ वर्षाखालील मुलींनी हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना उमरेड चमु विरुद्ध निमखेडा (ता.मौदा) असा रंगला होता. यात विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. नि:स्पृह शिक्षण संस्था, निमखेडा च्या वतीने कार्याध्यक्ष सुरेंद्र हटेवार, सचिव अखाडनाथ नानवटकर, कोषाध्यक्ष सुनील ठाकरे आणि शाळेच्या वतीने मुख्याध्यापक निनावे व सर्व शिक्षक भुजाडे, गोयले, आरीकर, तिजारे , बोरकर, राऊत, बोंद्रे, मरस्कोल्हे, गजभिये, पायल, ठाकरे, बरबटे, महादुले, नितनवरे, पडोळे, झाडे, आस्वले यांनी सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षक ईश्वर पत्रे, सय्यद अली व मार्गदर्शक संदेश नानवटकर, उमेश वैद्य यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
वयोगट १४ वर्षाखालील मुली चमुंचे चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय व्हाॅलिबाॅल क्रीडा स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.