Friday, October 18, 2024
Homeराज्यखामगाव | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम तर्फे अण्णाभाऊंना अभिवादन...

खामगाव | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम तर्फे अण्णाभाऊंना अभिवादन…

खामगाव – हेमंत जाधव

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम तर्फे दि.१८ जुलै रोजी खामगाव येथे अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण सोनोने होते, प्रथम मातंग समाजाचे जेष्ठ नेते महादेवराव अडायके यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर यांनी प्रस्तावीक केल्या नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी संताराम तायडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते भिकुलाल जैन सितारामजी इंगळे होते कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सुधाकर वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय नाटेकर यांनी केले कार्यक्रमाला सुभाष बाबुळकर अविनाश वानखडे विनोद बाबुळकर धनराज वानखडे बबलू कांबळे दीपक वानखडे आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: