Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनSagar Pandey ।बॉलीवूडमधील सलमान खानची दुसरी भूमिका साकारणारा सागर पांडे यांचे दुःखद...

Sagar Pandey ।बॉलीवूडमधील सलमान खानची दुसरी भूमिका साकारणारा सागर पांडे यांचे दुःखद निधन…

Sagar Pandey : चित्रपटसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या बॉडी डबलची भूमिका करणाऱ्या सागर पांडेचे ३० सप्टेंबर रोजी निधन झाले. जेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो जिममध्ये व्यायाम करत होता. बॉडीगार्ड या चित्रपटात तो सलमानच्या डुप्लिकेटच्या भूमिकेत होता. सागरला सागर सलमान पांडे या नावानेही ओळखले जात होते. गेल्या ऑगस्टमध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनाही जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. एम्समध्ये उपचारादरम्यान त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

सागर परिपूर्ण फिट होता

गेली दोन वर्षे चित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरली आहेत. एकापाठोपाठ एक आकस्मिक मृत्यूच्या बातम्यांनी सगळेच घाबरले आहेत. दीपेश भान, राजू श्रीवास्तव यांच्यानंतर कलाकार सागर पांडे यांचेही आकस्मिक निधन झाले. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा डुप्लिकेट प्रशांत वाल्डे याने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. प्रशांतने सांगितले की, सागर जीममध्ये व्यायाम करत असताना अचानक तो कोसळला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अनेक चित्रपटांमध्ये बॉडी डबल केले आहे

प्रशांत म्हणाला, मला खूप धक्का बसला आहे. तो तंदुरुस्त आणि निरोगी होता. त्याचे वय 40 ते 50 च्या दरम्यान असावे. सागरने अनेक चित्रपटात सलमान खानची बॉडी डबल भूमिका केली होती. यानंतर त्याने बजरंगी भाईजान, ट्यूबलाइट, दबंग, दबंग 2, दबंग 3 यांसारख्या चित्रपटांमध्येही सलमानच्या बॉडी डबलची भूमिका साकारली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: