नरखेड – जवाब तो यात्रेचे संयोजक सागर दुधाने यांनी सहकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या उपोषणाला आज न्याय मिळाला आहे, काटोल विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून सहकाऱ्यांसोबत सागर दुधाने यांनी साखळी उपोषण सुरू केले होते तीन दिवसाच्या उपोषणानंतर उपविभागीय अधिकारी व महावितरणचे अभियंता यांनी उपोषण सोडण्याबाबत विनंती करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते व आता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास शेतीसाठी वीज उपलब्ध झालेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाबद्दल सागर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी कार्यकारी अभियंता महावितरण श्री आघाव साहेब तसेच उपविभागीय अधिकारी शिवराज पोटोडे साहेब यांच्या पाठपुराव्याबद्दल विशेष आभार मानले आहे व यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जबाबदारीचा जवाब दो यात्रेचा लढा सुरूच राहील अशी ग्वाही दिली आहे.
त्याप्रसंगी त्यांच्यासमोर त्यांच्यासोबत उपोषण करते श्री स्वप्निल राऊत, अमित राऊत, प्रणय ठाकरे, चेतन गुडधे, रितेश कानोळकर, निकेश रेवतकर, गजानन टेंभेकर, साहिल ढोकणे, श्रेयस खुजे, राकेश वानखडे उपस्थित होते.