Monday, December 23, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागीय सचिवपदी सागर दीक्षित तर सांगली...

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागीय सचिवपदी सागर दीक्षित तर सांगली जिल्हा अध्यक्षपदी सुभाष शिंदे यांची निवड…

सांगली – ज्योती मोरे

कला शिक्षकांसाठी आणि कला विषयासाठी सातत्याने शासन दरबारी खंबीरपणे पाठपुरावा करणारी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पदी सागर अरविंद दीक्षित यांची तर जिल्हा अध्यक्षपदी सुभाष सदाशिव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान सागर दीक्षित हे आटपाडी मधील श्री भवानी विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना डीसीएम शासकीय चित्रकला परीक्षांचा एकूण 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुभाष शिंदे हे जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स जत मध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनी कला शिक्षकांसाठी आणि कला विषयासाठी भरीव योगदान दिलेले आहे.

विविध कला विषयाच्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा चित्र रंगभरण स्पर्धा राबवण्याचा त्यांचा हातखंडा आहे. या त्यांच्या कामाला महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणी पुढे या दोघा कला शिक्षकांची पदाधिकारी म्हणून निवड करण्याची शिफारस केली होती.

या शिफारशीच्या अनुषंगाने या दोघांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद शिंदे यांनी लेखी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.

दरम्यान या दोघांच्या नियुक्तीस प्रदेश उपाध्यक्ष राजेश निंबेकर, प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र इकारे,प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र निकुंभ, प्रदेश कोषाध्यक्ष सुहास पाटील, सहचिटणीस मोहन माने, प्रदेश महिला आघाडी प्रमुख नीता राऊत, प्रदेश सदस्य विवेक महाजन, नवाब शहा,रमेश तुंगार, विनोद इंगोले, प्रदेश सल्लागार सुनील महाले, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष धनाजी कराडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध शासन दरबारी प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्हा कार्यकारणी कटिबद्ध असेल, अशी प्रतिक्रिया नूतन सांगली जिल्हाध्यक्ष श्री सुभाष शिंदे यांनी नियुक्ती नंतर व्यक्त केली आहे.

सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली येथे प्रलंबित ए एम वेतन श्रेणी प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. विविध चित्रकला स्पर्धा रंगभरण स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ सांगली जिल्हा कार्यकारणी यापुढे सक्रियतेने राबवणार असल्याचे देखील त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

प्रत्येक प्राथमिक माध्यमिक खाजगी आणि शासकीय आश्रम शाळांमध्ये एक कलाशिक्षक कायमस्वरूपी भरण्यात यावा यासाठी वेळोवेळी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात येतील व न्याय मिळेपर्यंत महासंघाच्या वतीने सांगली जिल्हा कार्यकारणी अग्रेसर राहील. अशी प्रतिक्रियाही सुभाष शिंदे यांनी पुढे बोलताना व्यक्त केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: