आता विदर्भातही होणार काश्मीरच्या केसरची शेती, तीन महिन्यात उत्पादनाला झाली सुरुवात, गुप्ता यांनी देशाच्या राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना दिली केसरची रोपे भेट.
नरखेड – अतुल दंडारे
जगातील सगळ्यात महाग मसाल्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या केसरच्या शेतीला आता विदर्भात सुरुवात झालेली आहे. कापूस, संत्राच्या जोखमीच्या उत्पादनानंतर शेतकरी विविध पीक उत्पादन घेण्यासाठी प्रयोग करीता असताना नरखेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी अनोखा पद्धतीने केसरचे पीक उत्पादन करणे सुरु केले आहेत.
संपूर्ण जगामध्ये ३०० मेट्रिक टन केसरचे उत्पादन होते. त्यात भारताचा वाटा फक्त ७ टक्केच आहे. आपल्या देशात काश्मीर येथे २० ते २१ टन केसरचे उत्पादन घेतल्या जाते.त्याला ठोक बाजारपेठेत ४ लाख रु प्रति किलो तर किरकोळ बाजारात ६ लाख रु प्रति किलो विकल्या जाते. म्हणूनच त्याला लाल सोन म्हणून ओळखल्या जाते.
कोरोना काळात सर्व देश बंदिस्त असताना अभिजित गुप्ता व अर्ध्यागिनी रंजना गुप्ता यांनी बुद्धीमत्तेची दारे उघडत आधुनिक शेतीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा मानस केला होता. त्यासाठी त्यांनी आधुनिक पद्धतीने केसरची लागवड करता येईल का?
त्यात यशस्वी होण्यासाठी केसर लागवडीचा अभ्यास व माहिती घेण्याकरिता सहपत्नीक काश्मीर येथील पाम्पोर या गावात जाऊन तेथील केसर उत्पादक व जम्मू काश्मीर सरकारच्या केसर संशोधकाची भेट घेतली. केसर लागवडी करीता आवश्यक मार्गदर्शन घेतले. त्यानंतर नरखेडात केसर उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला त्यात त्यांना यश आले आहेत.
अशी केली केसरची लागवड
काश्मीर येथून ३५०० बियाणे आणून इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ५०० स्केअर फूट जागेची निवड केली, त्यात त्यांनी शीतगृहाची उभारणी करून केसर उत्पादनकरिता आवश्यक वातावरण तयार केले. त्यात त्यांनी आरोफोनिक पद्धतीने केसरची लागवड केली. त्यांना आता चार किलो केसर उत्पादित होणार आहे.
गुप्ता यांनी विदर्भासारख्या भागात शेतकरी आधुनिक पद्धतीचा वापर करून निरंतर होत असलेल्या वातावरणातील बदलाला मात देऊ शकतो. व व केशर सारखे महागडे उत्पादन घेऊन आपली आर्थिक उन्नती साध्य करू शकतो. त्यांनी त्यांच्या केसर मळ्यात उत्पादित केलेले केसर देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रोपदी मूर्मू, केंद्रीय मंत्री मा नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना केसाचे रोपटे भेट दिले आहे.
महामहिम राष्ट्रपती यांनी केसर लागवडीच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक केले असून अभिजीत गुप्ता यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रपती भावनातील मुगल गार्डन मध्ये केसर बीजारोपणाचा यशस्वी प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री मा नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुप्ता यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक करून विदर्भासारख्या भागात केसरची लागवड करून यशस्वी प्रयोग सफल केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.