काँग्रेसचे एकमेव खासदार चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचा दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचरासाठी दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात त्यांना किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी नागपुरात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांना दिल्लीच्या वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
27 मे रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आपल्या वडिलांचे अंतदर्शन घेता आले नाही. कालच त्यांच्या मृत्यूची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र कुटुंबांनी या अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले होते. मात्र अखेर आज सकाळीच मूर्तीच्या दुःखद बातमी समजताच संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून एअर ॲम्बुलन्स ने वरोरा येथे आणण्यात येणार आहे, सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
कट्टर शिवसैनिक ते काँग्रेस खासदार असा त्याचा राजकीय प्रवास. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यानी लवकरच पूर्ण केला.