Monday, December 23, 2024
Homeक्रिकेटSachin Tendulkar | सचिन तेंडुलकर यांनी ५० व्या वाढदिवसानिमित्य बनविले चुलीवर जेवण…

Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकर यांनी ५० व्या वाढदिवसानिमित्य बनविले चुलीवर जेवण…

Sachin Tendulkar : जगभरात भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक अर्धशतके झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतेच आपल्या आयुष्यातील अर्धशतक पूर्ण केले. एकीकडे 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता आणि प्रत्येकाला त्यांच्या कथा आठवत होत्या. दुसरीकडे, लिटल मास्टर त्याचा वाढदिवस गावात आपल्या कुटुंबासोबत खास पद्धतीने साजरा करत होता.

सचिन तेंडुलकर त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या कुटुंबासोबत गावातील माती आणि शांततेचा आनंद घेण्यासाठी गेला होता. त्याने तिथे चूल पेटवून जेवण बनविले. याचा एक फोटो सचिनने शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये सचिन तेंडुलकरसोबत त्याची पत्नी अंजली आणि मुलगी साराही दिसत आहेत. हे चित्र गावातील आहे. ज्यात तेंडुलकर चूल पेटवत आहे आणि मातीच्या हंडीमध्ये काहीतरी शिजत आहे.

सचिनला अर्जुन तेंडुलकरची उणीव भासली
सचिन तेंडुलकरने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘तुम्ही रोज अर्धशतकं करत नाही. परंतु जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा ते साजरे करणे आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेल्या गोष्टींसोबत राहणे योग्य आहे. अलीकडेच मी माझा खास 50 वा वाढदिवस माझ्या टीम आणि कुटुंबासोबत एका गावात साजरा केला.

सचिन तेंडुलकरने याच पोस्टमध्ये लिहिले की, अर्जुन तेंडुलकर या सेलिब्रेशनमध्ये मिस झाला, जो सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस २४ एप्रिलला वाढदिवस होऊन गेला मात्र शुभेच्छांचा वर्षाव अजून सुरूच आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: