कोगनोळी – राहुल मेस्त्री
सध्याच्या धावत्या युगात लोक इतके व्यस्थ असतात की समोर कोण अडचणीत असेल तर त्यांना मदत करण्याची इच्छा दाखवत नाहीत.पण याला अपवाद कर्नाटक राज्य युवा सेनेचे अध्यक्ष सचिन इंगवले हे ठरले आहेत.दोन दिवसापूर्वी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नजिक एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता.
त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली होती.अपघात झाल्यावर जमा झालेल्या नागरिकांनी रुग्णवाहीकेला संपर्क साधला पण बराच वेळ उलटूनही त्याठिकाणी रूग्णवाहीका पोहचली नव्हती.ही बातमी कर्नाटक राज्य युवा सेनेचे अध्यक्ष सचिन इंगवले यांना समजताच त्यांना घटनास्थळी येऊन रूग्णवाहीकेची वाट न पाहता स्वतःच्या चारचाकी वाहूनातुन अपघात झालेल्या व्यक्तीला कागल येथील सरकार ग्रामीण रुग्णालयात पोहचवुन समाजात नवा आदर्श केला आहे.
या सामाजिक बांधिलकी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत ते म्हणाले एकदा अपघात झाला तर रुग्णवाहीका उशीरा आल्यामुळे अपघाती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.त्यामुळे रुग्णवाहीका येण्यास उशीर झाल्यास अपघात झाल्यावर प्रथमदर्शी असणाऱ्या नागरिकांनी अपघाती व्यक्तीला रुग्णालयात पोहचवणे गरजेचे आहे असे सांगितले.याप्रसंगी त्यांच्या समवेत कर्नाटक राज्य युवा सेनेचे कार्याध्यक्ष करण शिंदे,कोगनोळी शाखाध्यक्ष अदित्य पाटील उपस्थित होते..