अमरावती जिल्ह्यातील मोर्शी उपविभागातील अट्टल चोरास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने जेरबंद केले आहे. आरोपी हा दुचाकिसह शेतातील मोटरपंप आणि केबल वायरची चोरी करायचा त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये या अट्टल चोराची दहशत होती. अशोक मोहन युवनाते, रा पांढरघाटी ता. वरुड जि. अमरावती असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस स्टेशन मोर्शी येथे फिर्यादी नामे विशाल कन्हैया दाभोडे, वय 32 वर्ष, रा आठवडी बाजार मोर्शी यांनी दिलेल्या रिपोर्टवरूण गुन्हा रजि. क्रमांक 378 / 2022 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असूण गुन्हयात अज्ञात आरोपीने होडा कंपनीची युनिकॉर्न काळया रंगाची क्रमांक MH 27 BR1713दुचाकि चोरी केली होती. सदर गुन्हयातील दुचाकी ही ग्राम पांढरघाटी ता. वरुड येथील अशोक मोहन युवनाते नामक इसमाकडे असल्याची गोपनिय खबर मिळाल्यावरूण दि. 18/10/2022 रोजी दुपारी 12/30 वा. सुमारास पांढरघाटी येथू आरोपी अशोक मोहन युवनाते यास ताब्यात घेऊन त्यास दुचाकिबाबत विचारपूस केली असता प्रथमतः त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन आणखी विचारपुस केली असता त्याने त्याचे ताब्यातील काळया रंगाची युनिकॉर्न दुचाकि क्रमांक MH 27 BR1713मोर्शी येथून चोरी केल्याचे सांगीतले. त्यांस अधिक सखोल विचारपुस केली असता त्याने मोर्शी, वरुड, येथून विविध कंपनीच्या एकूण 06 दुचाकी चोरी केल्या असूण 04 दुचाकी मध्यप्रदेश मधील ग्राम रोहना, मांजरी, ईटावा येथे विकल्या असूण 2 मोटार सायकली त्याचे ताब्यात मिळूण आल्याने 06 दुचाकि किं. अं. 2,97,000/- रू. च्या आरोपीसह मध्य प्रदेशमधून जप्त करण्यात आल्या.
तसेच नमुद आरोपीने विचारपूस दरम्यान सखोल विचारपुस केली असता त्याने पो.स्टे. वरुड हददीतील ग्राम जरुड, वरुड, रोशनखेडा, खडका येथिल शेतशिवारातील शेतातुन पाणबुडी मोटर व केबल व ग्राम ईसब्री, पाळा, भाईपुर मेंघवाडी शेतशिवार मधुन केबल वायर चोरी केल्याचे कबुली दिल्यावरूण मोर्शी उपविभागातील पोलीस स्टेशन मोर्शी, बेनोडा आणि वरूड येथील अभिलेखावरील दुचाकि चोरीसह पाणडुबी मोटर आणि केबल चोरीचे 15 गुन्हे ऊघडकिस आले आहे. नमुद आरोपीस जप्त मुद्देमालासोबत पुढिल कार्यवाहीकरीता पोलीस स्टेशन मोर्शी, येथे देण्यात आले असूण नमुद आरोपीकडूण अधिक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. शशीकांत सातव, मा. पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, सफौ संतोष मुंदाने, पोहवा रविंद्र बावने, बळवंत दाभने, दिपक सोनाळेकर, नापोकॉ चंद्रशेखर खंडारे, पोकॉ पंकज फाटे, पोकॉ दिनेष कनोजिया, चालक हर्षद घुसे यांनी केली आहे.