मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मूर्तिजापूर 31 मार्च ला सकाळी 7.30 वाजता भव्य सायकल रॅली आणि प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने कंबर कसली असून या लोकसभेत मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता वेग वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या निमत्ताने दिनांक 31 मार्च ला मूर्तिजापूर शहरातील विविध भागात आणि ग्रामीण भागातील मोठ्या गावात जसे माना, कुरुम, अनभोरा या ठिकाणी रण फॉर डमॉक्रासी चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्वीप च्या प्रमुख मुख्याधिकारी जिल्हा परिषद अकोला मा. वैष्णवी बी मॅडम, निवडणूक निर्णय अधिकारी मा. संदीप अपार साहेब,
तहसीलदार मा. शिल्पा बोबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात गटशिक्षणाधिकारी डॉ. नसीरुद्दीन अन्सार सरांच्या नेतृत्वात शहरातील शाळांचे जवळपास सातशे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी असतील. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असून सुद्धा रविवारी सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी मिळून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी नियोजन केले आहे.
यात शहरातील विविध भागातून सायकल रॅली व प्रभात फेरी च्या माध्यमातून मतदान करण्या साठी जाणीव जागृती करण्यात येईल करिता शहराच्या मुख्य भागात पथनाट्य द्वारे मतदान किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न आहे.
तरी या राष्ट्रीय कार्यात शहरातील व ग्रामीण भागातील सर्व सामाजिक संस्था नी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मा. संदीप अपार यांनी आव्हान केले आहे. तसेच सर्व पत्रकार महोदयांनी सुधा सहभागी व्हावं आणि या कार्याला प्रसिध्दी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
रण फॉर डे मॉक्रासि चा समारोप गाडगे महाराज विद्यालय येथे होईल. करिता सर्व नागरिकांनी आमच्या चिमुकल्याचा संदेश ऐकण्या करिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती