Sunday, December 22, 2024
Homeक्रिकेटझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांच्या निधनाची बातमी अफवा...

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांच्या निधनाची बातमी अफवा…

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी आल्यानंतर झिम्बावेचे गोलंदाज Henry Olonga हेन्री ओलांगा यांनी Twit करून हिथ स्ट्रीक जिवंत असल्याची पुष्टी केली.

हेन्रीने Twit केले की, मी पुष्टी करू शकतो की हिथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा अतिशयोक्तीपूर्ण आहेत. मी फक्त त्याच्याकडून ऐकले. तिसऱ्या पंचाने त्याला परत बोलावले आहे. तो जिवं आहे.

हिथ स्ट्रीक यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत असल्याची बातमी आलिओ होती तेव्हापासून हीथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक बनली होती. या वर्षी मे महिन्यात, झिम्बाब्वेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की हीथ दक्षिण आफ्रिकेत उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचे सांगितले होत.

हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
हीथने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. यानंतर डिसेंबर 1993 मध्ये हीथने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने शेवटची वनडे ऑगस्ट २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटची कसोटी सप्टेंबर २००५ मध्ये भारताविरुद्ध खेळली. हीथने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला तीनदा आणि सौरव गांगुलीला चार वेळा बाद केले. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, हीथने भारताविरुद्धच्या हरारे कसोटीच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली.

त्याने निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. हीथने त्या सामन्याच्या पहिल्या डावात 32 षटकात 73 धावा देत सहा विकेट घेतल्या. मात्र, त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही टीम इंडियाने तो सामना 10 गडी राखून जिंकला. हिथ स्ट्रीकने 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2943 धावा आहेत. टेस्टमध्ये हीथने एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 13 अर्धशतकं झळकावली. याशिवाय हीथने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत 73 धावांत सहा आणि एकदिवसीय सामन्यात 32 धावांत पाच विकेट अशी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षकही होता.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: