सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
पावसाळी अधिवेशनामध्ये सांगली विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मतदार संघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर रस्त्यावरील वाहतूक, वर्दळ, गावांची संख्या, लोकसंख्या तसेच रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेता या रस्त्यांचे मजबुतीकरण व सुधारणा करणे गरजेचे होते. रस्त्यांची सुधारणा व्हावी यासाठी गेले काही दिवस पाठपुरावा सुरु होता.
कामे नव्याने पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगितले. तसेच हरिपूर ते अंकली रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे- ५ कोटी , खोतवाडी ते नांद्रे रस्ता सुधारणा करणे – ६ कोटी , माधवनगर जकात नाका ते म्हसोबा जंक्शन र्स्डता रुंदीकरणासह सुधारणा करणे – ६ कोटी , समडोळी ते सांगलीवाडी रस्ता सुधारणा करणे- ५ कोटी, सांगली आकाशवाणी ते शामराव नगर ते हनुमान नगर ते हसरा चौक रस्ता सुधारणा करणे. १.५ कोटी, मौजे डिग्रज ते नावरसवाडी रस्त्याची सुधारणा करणे -४ कोटी, कदमवाडी ते सांगली वाडी रस्त्याची रुंदीरकणासह सुधारणा करणे. ३.५ कोटी…
शिरगाव फाटा ते खोतवाडी व बिसूर ते बुधगाव रस्ता सुधारणा करणे- ६ कोटी , कर्नाळ रोड वरील म्हसोबा मंदिर ते मौजे डिग्रज ते ब्रम्हनाळ कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे, – ७ कोटी, कर्नाळ ते म्हसोबा मंदिर रस्ता सुधारणा करणे – ६ कोटी व कुपवाड रोड अहिल्या नगर ते सांगली मिरज रोड वरील हनुमान मंदिर पर्यंत रस्ता सुधारणा करणे अशी एकूण ५५ कोटी रु चा निधी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पीय बजेट मध्ये मंजूर करण्यात आला आहे. तसेच नाबार्ड २८ मधून शास्त्री चौक हरिपूर रोड वरील लहान पूलाचे बांधकाम करणे – ४ कोटी, व नावरसवाडी फाटा जवळील लहान पुलाचे बांधकाम करणे.१२ कोटी अशी एकूण १६ कोटीची कामे नाबार्ड २८ मधून पुढील काळात मंजूर होतील अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.