न्युज डेस्क – गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर, दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने 28 व्या आवृत्तीच्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये बाजी मारत दोन पुरस्कार जिंकले असल्याने देशात राजामौलीसह त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. ‘आरआरआर’ने नाटू-नाटू या गाण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटासाठी ‘क्रिटिक’ चॉईस’ पुरस्कार पटकावला.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या ट्विटर हँडलने एक पोस्ट शेअर केली, “@RRRMovie च्या कलाकार आणि क्रू चे अभिनंदन – सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी #criticschoice पुरस्कार विजेते. #CriticsChoiceAwards.”
टीम आरआरआरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी कॅप्शन दिले, “नाटू-नाटू पुन्हा!! आम्ही सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी #RRRMovie साठी #CriticsChoiceAwards जिंकले आहेत हे सांगताना खूप आनंद होत आहे!”
‘‘नाटू-नाटू’ संगीतकार एमएम कीरावानी व्हिडिओमध्ये सांगताहेत, “खूप खूप धन्यवाद, मी या पुरस्काराने भारावून गेलो आहे. समीक्षकांकडून हा अप्रतिम पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी येथे आलो आहे. माझ्या कोरिओग्राफरच्या वतीने सर्व समीक्षकांचे आभार.
कीरावणीच्या नाटू-नाटू या गाण्याला नुकताच लॉस एंजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन (LAFCA) मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत स्कोअरचा पुरस्कार मिळाला. RRR च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजने अपडेट शेअर केले आहे.
RRR ही काल्पनिक कथा दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात 1,200 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्याही भूमिका होत्या.