Wednesday, July 17, 2024
spot_img
HomeSocial Trendingदेवदूत बनून आला आरपीएफ हवालदार...हृदयविकाराने पीडित व्यक्तीचे वाचवले प्राण...जाणून घ्या

देवदूत बनून आला आरपीएफ हवालदार…हृदयविकाराने पीडित व्यक्तीचे वाचवले प्राण…जाणून घ्या

मुंबई – रेल्वे फलाटावर प्रवाश्यांचे प्राण वाचविण्याचे कामात रेल्वे पोलीस फोर्स नेहमीच अग्रेसर असते, त्यांच्या चांगल्या कामाचे video अनेकदा सोशल मिडीयावर व्हायरल होतात. असाच एका प्रव्सःला वाचविण्यासाठी कसा देवदूत बनून RPF धावून आला. जेव्हा एका पुरुष प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो देवदूताच्या रूपात आला होता. त्यांनी वेळीच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) करून प्रवाशाचे प्राण वाचवले.

7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 च्या सुमारास मुंबईतील कुर्ला स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14-11 वर एक प्रवासी हृदयविकाराच्या झटक्याने बेशुद्ध पडला. त्याचा जीव वाचवण्यासाठी कॉन्स्टेबलने त्याला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) दिले.

ड्युटीवर असलेले रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) कॉन्स्टेबल मुकेश यादव घटनास्थळी पोहोचले आणि प्रवाशाला सीपीआर दिली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर आरपीएफने स्टेशन मास्तर आणि जीआरपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी आरपीएफ जवानांचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी सीपीआर दिल्यानेच प्रवाशाचे प्राण वाचू शकल्याचे त्यांनी सांगितले. सध्या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: