नागपूर – शरद नागदेवे
दि. ७ फेब्रुवारी, १९८६ रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा दि. ७ फेब्रुवारी, २०२४ रोजी ३८ वा वर्धापन दिन थाटामाटात साजरा होत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस; उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार; महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार असून, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर,
अपर मुख्यसचिव (सेवा) श्री. नितीन गद्रे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (साविस) श्री. सुमंत भांगे, तसेच कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर, यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम दि. ७ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ठिक ३.०० वा. शासनाच्या मार्गदर्शन व सहकार्याने उभारले जात असलेल्या, बांद्रा (पूर्व) येथील महासंघाच्या कल्याणकेंद्राच्या ठिकाणी होणार आहे.
महासंघाचा वर्धापन दिन हा राज्यातील सर्व अधिकाऱ्यांसाठी एक आनंद सोहळाच असतो. या कार्यक्रमाला महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी; संलग्न सर्व खाते संघटना तसेच जिल्हा समन्वय समित्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने अधिकारी महासंघाच्या वतीने, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे; केंद्र व अन्य २५ राज्यांप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे; सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरणे; वेतनश्रेण्यांमधील अन्याय दूर करणे; शासकीय अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या मारहाण – दमबाजीसंदर्भातील भा.दं. वि. कलम ३५३ मध्ये बदल करु नये; सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमधील केंद्राप्रमाणे रु. ५४०० ग्रेड पे ची मर्यादा रद्द करावी, आदी जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासन प्रमुखांचे प्रकर्षाने लक्ष वेधण्यात येणार आहे.
ग.दि. कुलथे (मुख्य सल्लागार), विनोद देसाई (अध्यक्ष), समीर भाटकर (सरचिटणीस), नितीन काळे (कोषाध्यक्ष