Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजन‘रूप नगर के चीते’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा...

‘रूप नगर के चीते’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा…

गणेश तळेकर

‘मैत्री’ या शब्दात आनंद, दिलासा आणि आधार अशा तिन्ही गोष्टी आहेत. आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हाच आशय अधोरेखित करणाऱ्या ‘रूप नगर के चीते’ या आगामी मराठी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मीती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे. येत्या १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देईल असा विश्वास चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केला. मैत्रीच्या नात्यातली आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते ती जपणे महत्त्वाचे असल्याचे सांगत हा चित्रपट प्रत्येकाला निखळ आनंद देईल असं दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी याप्रसंगी सांगितलं. या चित्रपटातून प्रेक्षकांना बॉलीवूड सारखी भव्यता अनुभवायला मिळेल असं निर्माते मनन शाह यांनी सांगितलं.

करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभु, मुग्धा चाफेकर, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, सौरभ चौघुले, रजत कपूर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे. १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ सर्वत्र प्रदर्शित होतोय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: