Saturday, December 21, 2024
Homeराज्यएशियन तायक्वोंडो स्पर्धेत रोहीत ने घातली सुवर्ण पदकास गवसणी...

एशियन तायक्वोंडो स्पर्धेत रोहीत ने घातली सुवर्ण पदकास गवसणी…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे संपन्न झालेल्या ओपन एशियन तायक्वोंडो चॅम्पियनशीप स्पर्धेत येथील ज्युबिली इंग्लीश शाळेचा इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रोहीत खंडारे याने सुवर्ण पदकास गवसनी घालत शाळेचे नाव लौकिक केले.

चिनापट्टी राम कुटिया इनडोर स्टेडियममध्ये दिनांक २२, २३ व २४ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या स्पर्धेत भारतासह आठ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. सिटी तायकोंडो क्लबच्या खेळाडूंनी आयटीएफयू एशियन टेकओनदो चॅम्पियनशीप – २०२४ या टेकओनदो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

स्पर्धेत रोहीत खंडारे याने कलर बेल्ट लढतीत प्रथम पारितोषिक प्राप्त करून सुवर्ण पदकावर नाव कोरले असून, ग्रुप टुल्समध्ये त्याला कांस्यपदक मिळाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, मुख्याध्यापक, शिक्षक,मार्गदर्शक प्रशिक्षक दिनेश श्रीवास व सर्व शिक्षकांना दिले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: