Rohit Sharma : भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी आज एकदिवसीय विश्वचषकात इतिहास रचला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले. रोहित वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर सात शतके आहेत. सचिनने सहा शतके झळकावली होती.
रोहित शर्माला 2015 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली. त्या आवृत्तीत त्याने शतक झळकावले. चार वर्षांनंतर, 2019 मध्ये जेव्हा तो विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आला तेव्हा त्याने पाच शतके झळकावली. आता अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून त्याने तेंडुलकरचा 12 वर्षे जुना विक्रम मोडला. सचिनने 1992 ते 2011 या सहा विश्वचषक स्पर्धेत 45 सामन्यांत सहा शतके झळकावली होती. विश्वचषकातील 19व्या सामन्यात रोहितने त्याला मागे टाकले.
रोहितने कपिल देवचा विक्रम मोडला
रोहितने 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. या बाबतीत रोहितने महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 72 चेंडूत शतक झळकावले होते. कपिल देव यांच्यानंतर वीरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. त्याने 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 81 चेंडूत शतक झळकावले होते.
1⃣3⃣1⃣ runs
— BCCI (@BCCI) October 11, 2023
8⃣4⃣ deliveries
1⃣6⃣ fours
5⃣ sixes
End of a spectacular knock from #TeamIndia Captain Rohit Sharma! 👏👏#CWC23 | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/4MdeFmd56Y