सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य सुरक्षा अभियानाला 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्त बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोटरसायकल रॅलीला बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ एच पी तुम्मोड यांनी हिरवी झेंडी दाखवली या रॅलीच्या माध्यमातून दुचाकीस्वरांनी हेल्मेट चा वापर करा… वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका…
वाहतुकीचे नियम पाळा या संदर्भाचे संदेश या रॅलीच्या माध्यमातून दिल्या गेलात शिवाय वाहतूक नियमांच्या संदर्भात माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनीचे आयोजन ही आरटीओ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे… यावेळी मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ तुम्मोड म्हणाले मि किती सुरक्षीत गाड़ी चालवितो त्यावर रस्त्यावर चालणा-यांच भविष्प अवलंबुन असत त्यामुळे सुरक्षीत वाहन चालवा आणि दुचाकी चालवितांना हेल्मेटचे वापर करा असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड मार्गदर्शन करतांना म्हणाले की वाहनधारांनी नेहमी आपल्या गाड़ीचा वेग कमी ठेवावा सर्वात जास्त मृत्यु हे अपघातात होतांत तेव्हा सर्वानी वाहतुकीचे नियम पाळवे असे आवाहन केले.. यावेळी जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्यासह परिवहन विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते 11 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यत रस्ता सुरक्षा सप्ताह जिल्हयात पाळल्या जाणार आहे.