- मेंढला ते वाढोना रस्त्याचे सुरू होते काम.
- रस्त्याच्या डाग डुजी साठी 70 लक्ष रुपये मंजूर.
- काम निकृष्ठ असल्याचा गावकऱ्यांचा आरोप.
- सरपंचांनी काम करणाऱ्या कंपनीला पत्र देत थांबवले काम.
- सुप्रीमो इन्फ्रा. कंपनी के घेतला कामाचा ठेका.
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील मेंढला ते वाढोना रस्त्याचे दुरुस्तीचे काम गेल्या 4 दिवसांन पासून सुरू होते.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 70 लक्ष रुपयांचा निधी सुध्दा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुप्रीमो इंफ्रा. या कंपनीने घेतले असून कंपनी कडून दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. कंपनी कडून करण्यात येणारे काम अतिशय निकृष्ठ असून दुरुस्ती साठी वापरण्यात येणारे साहित्य सुध्दा निकृष्ठ असल्याचा आरोप त्या भागातील नागरिकांनी केला आहे.
याबाबत त्या भागातील नागरिकांनी वाढो ना येथील सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या कडे तक्रार केली. मिळालेल्या तक्रारीवरून सरपंच यांनी रस्त्याची दुरुस्ती करणाऱ्या कंपनीला पत्र देऊन ते काम त्वरित थांबवायला लावलं. जो पर्यंत संबंधित विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी होत नाही तो पर्यंत काम सुरू करायचे नाही असे निर्देश त्या कंपनीला दिली.
सरपंच हरिभाऊ कवडती, उपसरपंच पांडुरंग बनाईत, ग्राम पंचायत सदस्य भूषण दंढारे, नितेश मानेकर, मनोज बोडखे, किशोर बोडखे, कोमल चापेकर, नितीन चापेकर, रोषण चापेकर, सुनील कथले, सचिन डोंगरे, सुनील काटे, होमराज चरपे यांनी स्वतः जाऊन रस्त्याच्या दुरुस्तीची पाहणी केली.