Monday, December 23, 2024
Homeराज्यमहामार्ग पोलिसांच्या वतीने गणेश भक्तांसाठी रोड मार्गदर्शक फलक...

महामार्ग पोलिसांच्या वतीने गणेश भक्तांसाठी रोड मार्गदर्शक फलक…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र, यांचे वतीने कोकणवासीय व इतर गणेशभक्तांचे स्वागता साठी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे हदीमध्ये राष्ट्रीय महामार्ग ४८ पुणे बेंगलोर रोडवर पेठ नाका, किणी टोल नाका, वाठार ब्रिज, शिये फाटा, उजळाईवाडी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २०४ कोल्हापूर ते रत्नागिरी या रोडवर शिवाजीपुल वाघबीळ या ठिकाणी बोर्ड व रोड मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.

तसेच किणी टोल नाका या ठिकाणी प्रथमोपचार करीता एक बुथ ठेवण्यात आहे. सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा होऊ नये याकरिता टोइंग क्रेन, टोइंग व्हॅन , रुग्ण वाहिका सुसज्य स्थितीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने गणेशभक्ताकरिता करीत टोल साफ केला असलेने सदरचे आदेश किणी टोल नाका व्यवस्थापनास दिले असून समक्ष तोंडी सूचना देखील देणेत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गणेशभक्त ज्या मार्गाने जाणार आहेत त्या गणेश भक्तांना टोल फ्री पास देण्याची व्यवस्था महामार्ग पोलीस केंद्र उजळाईवाडी या ठिकाणी करणेत आलेली आहे.

तरी गणेशभक्तंना प्रवासा दरम्यान काही अडचण आल्यास किंवा काही मदत हवी असल्यास पोलीस मदत केंद्र उजळाईवाडी येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेंडगे यानी केलेले आहे. यावेळी उपस्थित कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक चंद्रकांत शेंडगे व महामार्ग पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: