निल्सन IQ रिटेल ऑडिट रिपोर्ट, जानेवारी-डिसेंबर २०२१ नुसार २५ वर्षीय ब्रँड रिया हा भारतातील १०.८% शेअरसह मूल्य शेअरनुसार नंबर १ परफ्यूम ब्रँड
‘रिया’या आघाडीच्या परफ्यूम ब्रँडने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोरोनासारख्या महामारीतही बाजारपेठेतील आव्हाने स्वीकारून ८० कोटी उलाढालीसह परफ्यूम उद्योगात २५ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. १९९७ मध्ये कोलकाता येथे स्थापन झालेल्या, रियाला प्रतिष्ठित निल्सन IQ रिटेल ऑडिट रिपोर्ट, जानेवारी-डिसेंबर २०२१ द्वारे सलग तिस-या वर्षी व्हॅल्यू शेअरद्वारे भारतातील परफ्यूम सेगमेंट लीडर म्हणून देखील प्रमाणित करण्यात आले आहे.
निल्सन IQ रिटेल ऑडिट अहवाल, जानेवारी-डिसेंबर २०२१ नुसार, भारतातील परफ्यूम व्यवसाय भारतीय चलनानुसार ७९० कोटींचा उद्योग होता, ज्यामध्ये ई-कॉमर्स महसूल वगळला होता. २०२५ पर्यंत उद्योग भारतीय चलनानुसार १२०० कोटी (ई कॉमर्ससह) पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण भारतात उपस्थिती असलेला स्वदेशी ब्रँड २०२५ पर्यंत २४० कोटी रुपयांची उलाढाल साध्य करण्यासाठी २०२५ पर्यंत वाढत्या परफ्यूम उद्योगात २०% बाजारपेठेचा वाटा उचलण्याचे लक्ष्य ठेवत आहे.
“भारताला सुगंधी द्रव्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निर्मितीचा तब्बल ३०० वर्षे जुना इतिहास आहे. विविध सुगंधांशी सर्वसाधारण भारतीयांचे जे नाते असते आणि त्याला संस्कृतीचा जो अजोड वारसा जोडला गेला आहे, त्यामुळे भारतीय सुगंधी द्रव्यांना अनोखे असे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. परफ्यूमची पाश्चिमात्य संकल्पना ही ऐषाराम आणि दुर्मिळ अशा सुगंधी द्रव्यांवर आधारित असते आणि त्यामुळे सर्वसाधारण मुख्य प्रवाहातील भारतीय ग्राहकाला ती परवडत नाहीत.
रियाने अत्यंत हुशारीने स्वतःला प्रभावी भारतीय संकल्पनांशी आणि घाणेन्द्रीयांच्या ज्ञानाशी जोडून वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे महानगरांबरोबरच श्रेणी- १, २ आणि ३ बाजारपेठेतील ग्राहकांच्या सुगंधांच्या आवडीशी जोडणे शक्य झाले,” असे पर्पस प्लॅनेटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य विक्रम डागा म्हणाले.
“परफ्यूम या आता केवळ विशेष प्रसंगांसाठी न वापरता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली आहेत. त्यामुळे ब्रँडला श्रेणी २ आणि ३ शहरांमधील विस्तृत अशा असंघटीत आणि बनावट परफ्यूमची आव्हाने पेलावी लागतात. दैनंदिन वापरासाठी अस्सल जागतीक ब्रँड हे खूपच महाग असतात आणि ते सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेरील असतात, त्यामुळे ही परफ्यूम ही केवळ विशेष प्रसंगांसाठी वापरली जातात. आम्ही महागड्या जगातील ब्रँडची ही जागा घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्यावर लक्ष केंद्रित केले आहे,”असेही ते पुढे म्हणाले.
पर्पस प्लॅनेटची स्थापना २०२० साली रिया या ब्रँडची पुनर्रचना करत वैविध्यता व वृद्धी साधण्याच्या दृष्टीने केली गेली. ब्रँडचा विस्तार करायचा असून तिची नवीन ग्राहक विभागांमध्ये प्रत्यक्ष बाजारातील विक्री यांचा विस्तार करायचा आहे. याशिवाय विविध ई-कॉमर्स आणि सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही ब्रँडचा वावर वाढवायचा आहे.
“सध्या रिया अनेक प्रकारची परफ्यूम, डीओडरंट, रूम फ्रेशनर, एअर फ्रेशनर देवू करते. केरळव्यतिरिक्त आम्ही संपूर्ण भारतात कार्यरत आहोत. सध्याच्या बाजारपेठेत आम्ही आमचे वितरण अधिक आक्रमकपणे विस्तारत असून नवीन बाजारपेठेतही आम्ही प्रवेश करत आहोत.
परफ्यूमची आक्रमक वृद्धी साधत बाजारपेठेत अव्वल स्थान निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून त्याचबरोबर आम्ही सौंदर्य, ग्रुमिंग आणि वैयक्तिक निगा उत्पादनांच्या विभागांवरसुद्धा लक्ष केंद्रित करत आहोत. लवकरच त्यांची घोषणा केली जाणार आहे. रियाचे मूल्य आणि किंमत यांचे अतूट नाते आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर आमची सामाजिक व ई-कॉमर्सकेन्द्री अशी धोरणे असून ती अंतिम टप्प्यात आली आहेत,” असेही डागा पुढे म्हणाले.
विशेष म्हणजे, ब्रँडने कधीही पारंपारिक माध्यम जाहिरातींवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केलेला नाही. विश्वास आणि जागतिक दर्जाची परफ्यूम देण्यात सातत्यपूर्ण या गोष्टींमुळे हा ब्रँड उत्तम कामगिरी करत आला आहे.