Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यनद्या होणार अमृत वाहिन्या..! जिल्हाधिकारी तुम्मोड म्हणतात...'अवघे धरू सुपंथ!'

नद्या होणार अमृत वाहिन्या..! जिल्हाधिकारी तुम्मोड म्हणतात…’अवघे धरू सुपंथ!’

उद्यापासून नदी स्वच्छता मोहीमेला प्रारंभ

बुलडाणा, नदी हा नैसर्गिक आधार आहे. मात्र नद्यांची सद्यस्थितीत दुरावस्था झालीय. शासनाने लोकसहभागातून नदीशुद्धीकरणाचा निर्णय घेतलाय.उद्या १४ जानेवारीला ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाचा कोलवड येथे प्रारंभ होतोय.जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर या तीन तालुक्यातील ८४ किमी नदीपात्राची स्वच्छता करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड स्वतः उपस्थित राहतील. श्रमदानासाठी हजारो एकत्रित हातांची आवश्यकता असल्याने,’एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती सार्थ ठरवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

नद्यांची स्वच्छता करण्याचे शिवधनुष्य बुलडाणेकरांना उचलावे लागणार आहे. बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या उपस्थितीमध्ये पैनगंगा नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात होईल. यासाठी ३०० अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते कोलवड येथील नदीपात्राची स्वच्छता करतील.

चिखली तालुक्यात कोलारी ब्रम्हपुरी, किन्होळा, सवना, दिवठाणा पेठ, बोरगाव काकडे, पांढरदेव, उतदारा, पेठ येथे श्रमदान करण्यात येणार आहे. मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीचा पूल, घुमटामागील जानेफळ वेस परिसर, ओलांडेश्वर मंदिर येथे श्रमदान होणार आहे. जिल्ह्यात पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र आहे. या संपूर्ण नदीपात्राची स्वच्छता पूर्ण होईपर्यंत हे अभियान सुरूच राहणार आहे.नद्या अमृत वाहिन्या करण्यासाठी या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: