सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यात सध्या भेसळयुक्त दुधाचा गोरख धंदा सुरू असल्याने कृत्रिम भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढले आहे. सांगलीतील अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे .हे दूध तयार करण्यासाठी अनेक घातक रसायनांचा वापर होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने. आटपाडी तालुक्यातील हिवतड गावचे रहिवासी ऋषिकेश दिगंबर साळुंखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
दरम्यान गावामध्ये जनावरांची संख्या आणि प्रत्यक्षात उत्पादित होणाऱ्या दुधाचे प्रमाण कमी असतानाही दूध संघांना दुप्पट दुधाचा पुरवठा कोठून आणि कसा होतो? याची वस्तू स्थिती तपासणी गरजेचे आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध निर्माण करण्यात येते.
परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस अन्न व औषध प्रशासनाकडून दाखवले जात नाही.आणि ज्या ठिकाणी असा साठा सापडतो त्या ठिकाणी फक्त कागदोपत्री कारवाई करण्यात येते.असा आरोप करत ,दुधातील भेसळ बंद करण्यात यावी व भेसळ करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाला भेसळ सापडत नसेल तर पोलीस संरक्षण दिल्यास पंधरा दिवसाच्या आत अशी ठिकाणे शोधून दाखवण्याचा विश्वासही उपोषणकर्ते ऋषिकेश साळुंखे यांनी व्यक्त केला आहे