Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराजकीयजिल्हा वार्षिक योजनेचा आढावा, मंजूर विकासकामांना ३० जूनपूर्वी चालना द्यावी - जिल्हाधिकारी...

जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा, मंजूर विकासकामांना ३० जूनपूर्वी चालना द्यावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार…

अकोला – संतोषकुमार गवई

अकोला जिल्ह्यात मंजूर नियतव्ययानुसार विविध विकासकामांना 30 जूनपूर्वी चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक नियोजनभवनात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गतवर्षी वार्षिक योजनेद्वारे विविध विकासकामांना चालना देण्यात आली. ती तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत. विविध विभागांनी प्रत्येक कामांच्या सद्य:स्थितीसह अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा. ज्या कामांच्या मान्यता, निविदा आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण नसतील, त्या पुढील दोन आठवड्यात पूर्ण करून घ्याव्यात. यावेळी जिल्हाधिकारी गतवर्षीच्या नियोजनानुसार खर्चाचा आढावा घेतला.

पुढील वर्षात करावयाच्या कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. विविध क्षेत्रांतील कामांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार कामांचा समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. विविध विभागप्रमुख उपस्थित होते. 

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: